कॉकरोच जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र
System Hang झालंय. Youth Restart करणार…..
आमच्याबद्दल
तरुणांच्या हातात महाराष्ट्राचं भविष्य....
कॉकरोच जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र (CJPMH) हे केवळ एक राजकीय पक्ष नाही — ते महाराष्ट्रातील विद्यार्थी, शेतकरी पुत्र, बेरोजगार तरुण आणि डिजिटल पिढीचे एकत्रित आंदोलन आहे. आम्ही पारदर्शक राजकारण, रोजगारकेंद्रित धोरण आणि लोकाभिमुख शासनासाठी उभे आहोत.
- Degree घेऊनही बेरोजगार आहेत.
- १२ तास काम करूनही EMI भरताना घाबरतात.
- Tax भरतात पण रस्त्यावर खड्डेच मिळतात.
- System बदलणार नाही हे माहित असूनही प्रश्न विचारतात.
म्हणून आम्हीच महाराष्ट्राचे कॉकरोच.
कारण कितीही संकटं आली… तरी आम्ही जगतो.
OUR SYMBOL
आमचं चिन्ह: कॉकरोच
“कॉकरोच घाणीत नाही जन्माला येत. घाण सिस्टिम बनवते.”
सर्वाधिक Survive करतो
कोणत्याही परिस्थितीत जगतो
मारण्याचा प्रयत्न झाला तरी परत उभा राहतो.
आजचा महाराष्ट्रातील युवकही तसाच आहे.....
THE ENEMY
आमचा लढा कोणाविरुद्ध?
एका corrupt system विरुद्ध आमचा digital विद्रोह
भ्रष्ट व्यवस्था
घराणेशाही
जाती-धर्मावरचं राजकारण
गोदी मीडिया
गुन्हेगारी राजकारण
बेरोजगारी
विद्यार्थ्यांचं शोषण
पैशाने विकत घेतलेली निवडणूक
MANIFESTO
घोषणापत्र
१४ क्रांतिकारी मुद्दे — महाराष्ट्र restart करण्यासाठी
आमदार-खासदारांच्या अनावश्यक सुविधा बंद
जनतेच्या करातून मोफत रेल्वे प्रवास, luxury सुविधा, अनावश्यक सरकारी खर्च बंद करण्यात येतील.
शिक्षण आणि बुद्धिमत्तेवर राजकारणात प्रवेश
राजकारणात प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता, प्रशासनिक समज आणि सार्वजनिक ज्ञान आवश्यक असेल.
जातीय आणि धार्मिक द्वेषावर कठोर कारवाई
धर्म आणि जातीच्या नावावर द्वेष, हिंसा, समाजात फूट पाडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
शिक्षण आणि सरकारी सेवा
merit, skill, quality यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
आर्थिक आधारावर आरक्षण
नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण आर्थिक परिस्थितीनुसार दिले जाईल.
महिला सक्षमीकरण
महिलांना राजकारणात ५०% आरक्षण दिले जाईल.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना बंदी
गंभीर गुन्हे, भ्रष्टाचार, हिंसाचार किंवा महिला अत्याचार सिद्ध झालेल्या व्यक्तींना निवडणूक लढवण्यास कायमस्वरूपी बंदी.
तीन वेळाच निवडणूक लढवण्याची मर्यादा
राजकारण हे career नाही. कोणत्याही व्यक्तीला जास्तीत जास्त ३ वेळाच निवडणूक लढवता येईल. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे.
न्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणतेही लाभ नाहीत
कोणत्याही मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश यांना निवृत्तीनंतर राज्यसभा, सरकारी पद किंवा विशेष लाभ दिले जाणार नाहीत.
एका घरातून फक्त एकच उमेदवार
घराणेशाही संपवण्यासाठी एका कुटुंबातील फक्त एका व्यक्तीलाच निवडणूक लढवण्याची परवानगी असेल.
प्रत्येक वैध मताचे संरक्षण
जर कोणतेही वैध मत जाणीवपूर्वक रद्द, manipulate किंवा suppress केले गेले तर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी.
गोदी मीडिया संपवणार
कॉर्पोरेट आणि राजकीय दबावाखालील माध्यमांवर चौकशी केली जाईल. स्वतंत्र, निर्भय आणि लोकशाहीवादी माध्यमांना संरक्षण दिले जाईल.
जाहीरनाम्यातील आश्वासन
निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण न करणाऱ्या प्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई आणि कारावासाची तरतूद असेल.
राजकीय पक्षांतरावर २० वर्षांची बंदी
जनतेच्या मतांचा विश्वासघात करणाऱ्या आमदार-खासदारांनी पक्ष बदलल्यास २० वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी असेल.
सामील व्हा
CJPMH मध्ये तुमचं स्वागत आहे.
खाली फॉर्म भरा आणि “ System Sali Chor Hai ” म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या #MainBhiCockroach युवा मोर्चाचा भाग बना.
३६ जिल्हे. एकच आवाज.
